Share

IPL 2022 : “तो एक प्रभावी खेळाडू…”, हैदराबादच्या स्टार फलंदाजाबाबत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वक्तव्य; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल (IPL 2022) हंगाम शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी सामन्यांमधील फक्त पाच सामने शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत करून त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. या सामन्यात हैदराबादचा मधल्या फळीचा फलंदाज राहुल त्रिपाठीने तुफानी अर्धशतक ठोकले. राहुलच्या या खेळीनंतर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांनी त्याच्याबद्दल मोठ वक्तव्य केले आहे. लवकरच राहुल त्रिपाठी भारतील संघात स्थान मिळवेल, असे मत शास्री यांनी व्यक्त केले.

रवी शास्त्री काय म्हणाले?

राहुल त्रिपाठीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात १७२.७३ च्या स्टाईक रेटने ४४ चेंडूत ७६ धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठी भारतीय क्रिकेट संघाचा दरवाजा ठोठवताना दिसत आहे. लवकरच तो भारतीय संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. सतत त्याच्या बॅटमधून धावा निघल्यास लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते त्याच्याबाबत नक्कीच विचार करतील. त्रिपाठी हा खूप आत्मविश्वासी खेळाडू आहे. तो एक प्रभावी खेळाडू आहे”, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.

यंदाच्या आयपीएलमधील राहुल त्रिपाठीची कामगिरी

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या या हंगामात त्रिपाठीने हैदराबादसाठी ३९.३० च्या सरासरीने आणि १६१.७२ च्या स्ट्राइक रेटने तीन अर्धशतकांसह ३९३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३९ चौकार आणि १९ षटकार आले. शास्त्री यांनी त्रिपाठीच्या बेधडक फलंदाजीचे कौतुक केले, तो कोणत्याही गोलंदाजासमोर निडरपणे उभा राहून आपल्या शैलीत फलंदाजी करतो.

महत्वाच्या बातम्या: 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!