मुंबई: भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार काल (२४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ात या पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची उपस्थिती होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आमंत्रण पत्रिकेवर नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली. यावरूनच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधत टीका केली होती. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
“कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल बोलतात, इतके वाईट दिवस आहेत. या कुटुंबाची उंची किती?आपली उंची किती? बोलतो किती?”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल बोलवा, इतके वाईट दिवस आहेत. या कुटुंबाची उंची किती?आपली उंची किती? बोलतो किती? pic.twitter.com/VSo9cUF69c
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 24, 2022
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याचे मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल सहकुटुंब शिवडीमधील शिंदे आजींच्या भेटीला गेले होते. मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये शिंदे आजी दिसून आल्या होत्या. त्यांचा पुष्पा स्टाईल ‘झुकेगा नही’ हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 LSG vs MI : रोहितसेनेचा खेळ खल्लास..! मुंबई इंडियन्सचा सलग आठवा पराभव
- IPL 2022 LSG vs MI : केएल राहुलचं पुन्हा शतक..! लखनऊचं मुंबईला १६९ धावांचं आव्हान
- “लतादीदींच्या नावे मिळणारा पुरस्कार जनतेला अर्पण करतो” : दीदींच्या आठवणीत मोदी झाले भावूक
- VIDEO : महाराष्ट्र-राजस्थानच्या क्रिकेटपटूंमध्ये राडा..! स्मृती मंधानाला केलं ‘मंकडिंग’ आणि मग पुढे..!
- IPL 2022 LSG vs MI : वानखेडेवर मुंबईनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

