मुंबई : रंगांमध्ये अनेकदा विषारी घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामध्ये अनेकदा हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ, लालसर डोळे, अंधुक दृष्टी आणि अगदी अंधत्व येऊ शकते.
होळीचा रंग एखाद्याच्या डोळ्यात गेल्यास यातून डोळ्याला गंभीर दुखापत होऊ शकते. होळीमध्ये वापरल्या जाणार्या रंगांमध्ये रासायनिक आणि धातूचे दूषित घटक असू शकतात जे डोळ्यांच्या पृष्ठभागासाठी खूप वाईट असतात. ते डोळ्याच्या पारदर्शक पृष्ठभागाला इजा करू शकतात. यामुळे एपिथेलियल दोष, ओरखडे किंवा न बरे होणारे कॉर्नियल अल्सर होऊ शकतात.
रंग चुकून डोळ्यांत गेला तर डोळे चोळू नका. ताबडतोब डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. रंगीत फुगा किंवा वॉटर गनमुळे डोळ्याला दुखापत झाल्यास, ताबडतोब उपचार घ्या कारण उशीर केल्याने दुखापत अधिक गंभीर होऊ शकते. डोळे स्वच्छ पाण्याने धुत असताना वारंवार डोळे उघडबंद केल्याने रंगाचे कण निघून जाण्यास आणि रसायनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्वचारोगतज्ज्ञ यांनी सांगितले आहे की होळीच्या रंगांचा आपल्या त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. कृत्रिम रंगांमुळे दुष्परिणाम होत असतात. जेव्हा तुम्ही रंग काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते काढणे कठीण होते, ज्यामुळे त्वचेला पुरळ आणि जळजळ होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
