Share

याच व्यक्तीमुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झालं आहे ते कोणत्या नैतिकतेमध्ये बसते? नितेश राणे यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव हे सध्या त्यांच्या वक्तव्या मुळे चर्चेत आहे. मुख्यमंत्र्यांनी पुराची पाहणी करण्यासाठी चिपळूण येथे दौरा केला होता. त्यावेळी जाधवांनी एका महिलेला अरेरावीची भाषा केली. नुकतेच त्या महिलेची प्रतिकिया देखील आली. त्या महिलेने म्हंटले, ‘त्यांचा आवाजच रावडी राठोडसारखा असल्याने गैरसमज होता. त्यांचं बोलणं कठोर आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात,’ असेही त्या महिलेने सांगितले.

दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी जाधवांवर निशाणा साधला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, भास्कर जाधवांच्या भावनिक सोंगामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. त्यांनी विधानसभेत भाजप आमदारांवर खोटे आरोप लावले? असे राणेंना या वक्तव्यातून म्हणयचे आहे असे स्पष्ट होते. तसेच ‘मी सांगितले होते की, हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच आहे. तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज एका महिलेवर हात उगारताना दिसला. अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्या मुळे विधानसभेमधल्या आमच्या १२ आमदारांचे निलंबन करणे कोणत्या नैतिकतेत बसते?’ असा सवल देखील राणेंने उपस्थित केला आहे.

ओबीसी आरक्षणावरून पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला होता. राज्यामध्ये पाच आणि सहा जुलै रोजी पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं होतं. त्यांच्या निलंबनाचे कारण ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गोंधळानंतर गैरवर्तवणूकीचा आरोप करत भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करत असल्याची घोषणा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली होती. त्यामुळे आता घडलेल्या या कृत्यावरून विरोधी पक्ष जाधवांना धारेवर धरत आहे का? असा सवाल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!