पुणे : कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असतानाच सध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी महापुराचे संकट ओढावलं आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री आणि आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला 61 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ६१ किलोंचा मोदक अर्पण करून महाआरती केली आहे. यावेळी माजी आमदार रवींद्र मिर्लेकर,पुणे शहर संपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या पद्धतीने पुण्यात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिवसेना पुणे शहराच्यावतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, आणि देवाचे आभार मानतो. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. भयंकर अशा कोरोना रोगापासून संपूर्ण जगाला आणि महाराष्ट्राला मुक्ती मिळावी. तसेच अतिवृष्टीमुळे जे दगावले गेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या नैसर्गिक आपत्तीमधून सुटका होण्यासाठी जास्तीतजास्त बळ, शक्ती आणि सेवेची संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला मिळावी. शिवसेनेला सुरक्षित ठेवून, प्रत्येकाला दीर्घ आयुष्य मिळावे’, अशी प्रार्थना नीलम गोऱ्हे यांनी गणरायाला केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यावरील पुराचे संकट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- पाणी उपसा केंद्र बुडाल्याने सांगली, कुपवाडचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद राहणार
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- गुजरातमध्ये पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं 9 वी ते 11 वी चे वर्ग सुरु होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
