Share

छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगाबादसाठी योगदान काय? नामांतराच्या मुद्द्यावरून सपाचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘औरंगाबाद शहराचे हे नाव ब्राह्मण लोकांनी दिलेले आहे. औरंग म्हणजे अनेक रंग, जेब म्हणजे शोभनीय. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपले जीवन पुणे, रायगड येथे व्यतीत केले. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे म्हणजे केवळ राजनीती आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी औरंगाबाद शहरासाठी काय योगदान दिले? कि ज्यासाठी शहराला त्यांचे नाव द्यावे. ज्या ५२ दरवाज्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव गाजले त्यांचे नाव बदलण्याचा अट्टहास का ?’ असे अनेक आरोप समाजवादी पक्षाचे फैसल खान यांनी गुरुवारी (दि.२८) आयोजित एका पत्रकार परिषदेत केले.

पुढे शहराच्या कारभाराविषयी बोलताना ते म्हणाले , ‘महानगरपालिकेतील अधिकारी पैसे खाण्यासाठीच बसलेले आहेत. आता आलेल्या नवीन आयुक्तांनी देखील रस्ते कामात आपले खिसे भरले आहेत. त्यामुळे त्यांनी विकासाच्या गोष्टी करू नये. मास्क सक्तीसाठी त्यांनी ज्या पथकाची नियुक्ती केली आहे. त्या पथकाचे अनेक गैरव्यवहार उघड झाले आहेत. मुंबई-पुणे येथे कार मध्ये जात असलेल्या कुटुंबाला मास्क सक्ती अनिवार्य नाही. त्याच्या उलट औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी हे मात्र कार मध्ये बसलेल्या फॅमिलीकडून दंड वसूली करतात.

काही ठिकाणी सेटलमेंन्ट केली जाते. महानगरपालिकेला बजेटमध्ये ५ टक्के अपंगासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु औरंगाबाद महानगरपालिकेकडून मागील ३ वर्षात या रकमेचा वापर अपंगाच्या विविध कार्यासाठी केलेला दिसून येत नाही. एमआयएम, शिवसेना, आणि भाजप या तिन्ही पक्षांनी नामांतर, धार्मिक मुद्दे हे विषय सोडून निवडणूक लढवून दाखवावी असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!