सिंधुदुर्ग : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडलं होतं. या निवडणुकांचं निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी अधिक सक्रिय सहभाग घेतल्याने या निवडणूका नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली होती.
दरम्यान, भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे. ‘एक ग्रामपंचायत गेली म्हणून काही होत नाही, इतर ठिकाणी चंद्रकांत पाटलांचं काम भक्कम आहे, टीका करणारे करत राहतात. चंद्रकांत पाटलांचं काम चांगलं आहे.’ असं नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला होता. यावरून नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘उद्धव ठाकरेंनी समजावून सांगावं राज्यातल्या तिजोरीत किती पैसे आहेत, राज्याची अर्थव्यवस्था काय आहे,’ असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हानच दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा शेतकरी आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा !’
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- ‘मी सुद्धा हिंदू आहे…’ तांडवच्या वादात उडी घेतल्यानंतर स्वरा भास्कर ट्रोल !
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
