पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली होती.
शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने केली होती.याशिवाय हिंदू धर्मियांचा,भारतीय संघराज्याचा,न्यायपालिकेचा अवमान करणारी अनेक वक्तव्ये त्याने केली आहेत. देशभरातून या गोष्टीचा निषेध नोंदविला जात आहे.
अॅड. प्रदीप गावडे यासंदर्भात बोलताना म्हणाले‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते. या पुढे शरजिल उस्मानी याने भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असे विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे आणि भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम 124A नुसार गुन्हा आहे’.
दरम्यान, या आधी देखील एल्गार परिषदेत अत्यंत भडक भाषणे करून विविध वाद उत्पन्न झाल्याचे सर्वश्रुत आहे.यंदाच्या परिषदेत शरजील उस्मानीने केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जाऊ का दिले? पोलिसांनी त्याच्यावर ताबडतोब कारवाई का केली नाही असे सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
शरजीलला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे, असा आरोप आ.आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन करत मागणी लावून धरल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे म्हणणे ही पश्चात्तापबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
एल्गार परिषदेवरून या आगोदर झालेला वाद समोर असूनही पोलिसांनी परवानगी देवून नेमके काय साध्य केले हे त्यांनाच ठावूक. शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य केले त्यावेळी त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता.पोलिसांनी स्वतः देखील त्याचे हे विषारी फुत्कार ऐकले आणि पाहिले असताना त्यावर का कारवाई झाली नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे बर तक्रार दाखल होऊन देखील पोलिसांनी ताबडतोब काही कारवाई करण्यासंदर्भात हालचाली का केल्या नाहीत याबाबत देखील प्रश्न आता विचारले जात आहेत.एकूणच ही परिषद आयोजक आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही तर बाळासाहेबांची इच्छा’, मनसेचे स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
- आम्ही त्यांच्या धमकीला घाबरत नाही; अजित पवारांचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रत्युत्तर
- महाराष्ट्रात कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर संघटनात्मक बदल करावे लागणार
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना

