🕒 1 min read
नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला आहे.
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 28, 2021
सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात सिद्धू लिहितात, तडजोड केल्याने माणसाचं चरित्रच संपुष्टात येतं. मी पंजाबच्या भविष्यासोबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मात्र, आगामी काळात काँग्रेससाठी काम करतच राहीन.
महत्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
