ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला 20 षटकांचा सिडनी येथे झालेला सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 195 धावांचे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. शिखर धवन 52, विराट कोहली 40 आणि हार्दिक पंड्याच्या नाबाद 42 धावांनी भारताचा विजय साकार केला.
या दरम्यान विराट कोहलीने आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये T २० मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. महेंद्र सिंग धोनीनं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हा पराक्रम केला होता. पण त्याला इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून हा पराक्रम करता आला नाही.
महत्वाच्या बातम्या
- पुणे शहरात दिल्लीप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच ?
- घराबाहेर बॅरिकेट्स लावत अखिलेश यादवांना शेतकरी आंदोलनात सामील होण्यापासून रोखलं !
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण
- शरद पवारांनीच शेतकरी हितासाठी खाजगीकरणाला पाठिंबा दिला होता- भाजप

