मुंबई:- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं ऑगस्ट २०१० मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लिहिलेलं एक पत्र आता समोर आलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त केली होती. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झालं. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीलं आहे, अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.
११ ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी शीला दीक्षित यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कृषी कायद्यात बदलाची गरज व्यक्त केली होती. कृषी क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाची गरज असल्याचं पवार म्हणाले होते. इतकच नाही तर सध्या ज्या APMC वरुन मोठा विरोध पाहायला मिळत आहे, शरद पवार यांनी २०१० मध्येच APMC कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. तसंच २००५ आणि २००७ मध्ये लिहिलेल्या पत्राचीही आठवण करुन दिली होती. इतकच नव्हे तर शरद पवार यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही नोव्हेंबर २०११ मध्ये पत्र लिहिलं होतं. त्यात कृषी कायद्यातील सुधारणांसह खासगी गुंतवणूक आणि APMC कायद्यातील बदलाची गरज बोलून दाखवली होती.
दरम्यान, आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आरएसएस नावाचाच आग्रह का? सर्वोच्च न्यायालायाचा याचिकाकर्त्याला सवाल…
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने केला ‘हा’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

