🕒 1 min read
मुंबई : आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने (State Government) एक नवीन आभियान राबण्याचा निर्णय घेतला असून, आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) या शब्दांनी अभिवादन करावे लागणार आहे. याबाबतचा जीआर काढून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.
या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा नियमभंग करणारी, घटनाबाह्य नाही. तर ती जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘वंदे मातरम’ला आमचा विरोध नाही. पण आपला देश कृषीप्रधान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या अन्नादात्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’ म्हणावे अशी आमची भूमिका असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. टिळक भवन येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पटोले बोलत होते.
सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या शब्दांनी अभिवादन करावे लागणार आहे. याची घोषणा राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. परंतू काल म्हणजेच शनिवारी याचा सरकारी अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच या नव्या अभियानाला वर्ध्यातून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
त्यामध्ये म्हटलं आहे की,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. काय आहेत नियम जाणून घ्या –
नियम :
1.विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी करावी.
2.ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
3.सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून ‘हॅलो’ संबोधन न वापरता, ‘वंदे मातरम्’ म्हणावे.
4.कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस ‘वंदे मातरम्’ हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
5.कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांनाही सार्वजनिक जीवनात “वंदे मातरम्” ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
6.शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘हॅलो’ असे न म्हणता ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना ‘वंदे मातरम्’ असे संबोधन करावे.
महत्वाच्या बातम्या :
Narayan Rane | बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते – नारायण राणे
Health Tips | काजू खाल्याने शरीर राहते निरोगी, जाणून घ्या!
Ramdas Kadam । दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाही; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत
Narayan Rane | “शिवसेनेचा अंत जवळ आलाय”, नारायण राणेंचा ठाकरेंना टोला
Apple iOS 16 Update | Apple ने नुकतेच आपले iOS 16 लाँच केले आहे, काय आहे त्यात विशेष जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
