Share

Health Tips | काजू खाल्याने शरीर राहते निरोगी, जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

ड्रायफूट मध्ये भरपूर पोषकतत्वे असतात. त्यामुळे डॉक्टर्स देखील चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला देत असतात. ड्रायफूट खायला सगळ्यांना आवडते. त्यामध्ये बदाम,काजू, मनुके इत्यादींचा समावेश होतो. या सर्व ड्रायफ्रूट्स मध्ये काजू हा सर्वात जास्त चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. काजूच्या नियमित सेवनाने तुम्ही निरोगी राहू शकतात. कारण काजू मध्ये अनेक पोषक घटक असतात.

काजूमधील पोषक घटके

काजूमध्ये कॉपर, मॅग्नीज, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक तत्वे आहेत. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काजू मध्ये अँटी ऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे काजूचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहू शकते.

काजू खाण्याचे फायदे

काजू खाल्ल्याने BP कंट्रोल मध्ये राहतो

काजूमध्ये हाय पोटॅशियम आणि लो सोडियम असते. त्यामुळे काजूचे सेवन आपल्या ब्लड प्रेशर वर नियंत्रण ठेवू शकते.

काजूचे सेवन हृदयरोगांपासून दूर ठेवते

हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करणारे अल्कलाइन अँसिड हे काजूमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे काजू हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

काजुमुळे शरीराला मुबलक प्रमाणात कॉपर आणि विटामिन इ  मिळू शकते

काजूमध्ये कॉपर आणि विटामिन इ आढळते. विटामिन इ रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणाऱ्या प्लेक पासून प्रोटेक्ट करते.

काजू मधील ओमेगा 3 फॅटी अँसिड आहे फायदेशीर

काजू मध्ये आढळणारी पोषक तत्वे कोलेस्ट्रॉल पातळी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते, आणि त्याचबरोबर जळजळ कमी करते. काजूमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अँसिड ह्रदयाचे ठोके सुरळीत ठेवण्यास मदत करते. आणि त्याचबरोबर काजू खाल्ल्याने हृदय सुद्धा निरोगी राहते.

वरील गोष्टींसाठी तुम्ही तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. काजू आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वापर हा चांगला नाही. त्यामुळे दररोज चार ते पाच काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तुम्ही जर काजूचे अति सेवन केले तर त्यामुळे तुमच्या शारीरिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!