🕒 1 min read
वर्धा : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवतीर्थावर एक ऐतिहासिक दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाने यासाठी कंबर कसली असून शिंदे गट देखील यात मागे नाही. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले जात आहेत. अशातच आता भाजप नेते नारायण राणे यांनी वर्ध्यातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. एमगिरी येथील सभागृहात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. “दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आपसात कॉर्डीनेट साधत आहे. परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कॉर्डीनेट नसून त्यांना कॉर्डिनेटची गरजच नाही” असे नारायण राणे म्हणाले. तसेच त्यांनी म्हटले की दसऱ्याच्या दिवशी कळेल आणि त्याच दिवशी त्यांचं पितळ उघड पडेल. शिवसेना तरी अस्तित्वात आहे का? उरलेले आमदार सुद्धा पक्ष सोडून जातील असं भाकीत त्यांनी यावेळी केलं.
त्याबरोबरच शिवसेनेचा अंत जवळ आला असल्याचा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. बाळासाहेब जिवंत असते तर उध्दव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला बरेचशे धक्के दिले जात आहेत. आता फक्त मला एवढीच काळजी आहे की या धक्क्यांना उद्धव ठाकरे नीट सांभाळून घेतील का? अशी बोचरी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
महात्मा गांधींच्या स्मारक निर्मितीसाठी येत्या सहा महिन्यांत समिती स्थापन करुन येत्या अडीच वर्षात ३८ एकराच्या परिसरात स्मारक उभारले जाईल अशी माहिती देखील राणेंनी यावेळी दिली. या स्मारकाच्या माध्यमातुन युवा पिढीला महात्मा गांधी यांच्या ग्रामीण औद्योगिक प्रगतीबद्दल माहिती आणि योग्य ते प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं आश्वासन राणेंनी यावेळी दिलं.
महत्वाच्या बातम्या :
Arvind Kejriwal | गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला
Ashish Shelar | “संसार तिघांचा, पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले…”; आशिष शेलारांची बोचरी टीका
Car Update | फेस्टिव्ह सीजनमध्ये ‘या’ कार ग्राहकांना करत आहेत विशेष आकर्षित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
