Share

Ramdas Kadam । दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाही; रामदास कदमांनी व्यक्त केली खंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची जोरदार तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर शिवसेना हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे परंपरेनुसार असलेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देखील शिंदे गट दसरा मेळावा घेऊन शिवसेनेवर ताबा सांगणार आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी खरी राजकीय मेजवानी असणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे.

यानंतर हे दोन्ही मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते रामदास कदम या दोन्ही मेळाव्यांवर खूश नाहीत. दोन मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच रामदास कदम यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काय म्हणले रामदास कदम?

रामदास कदम मीडियाशी बोलताना म्हणाले कि, दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. पक्ष उभा केलाय. केसेस घेतल्या आहेत. सगळं आपण भोगलंय. त्यामुळे दुःख होत आहे, अशी वेदना रामदास कदम यांनी बोलून दाखवली.

शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख झालंय, दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं चातकासारखे वाट बघत होते. ते विचार उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. विचार बाळासाहेब यांचेच. बाकी कुणाचे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे फक्त अफजलखानाचा विषय आणि भाजप टार्गेट असेल, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!