🕒 1 min read
मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये दररोज वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपांसमोर मोदींचे बॅनर्स झळकावत आंदोलन करण्यात आलं.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदींच्या बॅनरर्सवर ‘बघतोय काय रागानं, पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं’, असं लिहिण्यात आलं आहे. आंदोलकांनी पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.
मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर 94.92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
दरम्यान, इंधन दरवाढीमुळे अनेक भागात आंदोलन करण्यात आली, मात्र याचा कोणताच परिणाम झाला नाही. अजूनही सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीपासून कोणताच दिलासा मिळत नाही. उलट सणासुदीच्या काळात घरगुती गॅस, तेल, भाजीपाला, मांसाहार या वस्तूंमध्ये देखील कमालीचे वाढ होत असल्याने सर्वसामानी नागरिक त्रस्त झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची देगलूरच्या कार्यकर्त्यांना ऑफर
- पात्रता नसताना सत्ता आल्याने जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटले- भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
