Share

कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, येडियुरप्पा यांची कोल्हेकुई सुरूच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन! असे म्हटले होते मात्र आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी एक लक्ष्यवेधी भूमिका घेतली.

कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नाही, असा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. हे दुर्दैवी आहे. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. या बाजूची एक इंचही जमीन कोणालाच दिली जाणार नाही, असे येडियुरप्पा यांनी ठाकरेंना ठणकावून सांगितले.दरम्यान, आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!