औरंगाबाद : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विशेषतः शहरात नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक गतीने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मनपाने शासकीय कार्यालयात कोरोना चाचणी केली. दिवसभरात एकूण तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नेहमीप्रमाणे उत्साहात, सकारात्मक विचाराने कामासाठी गेलेल्या कर्माचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येतेय.
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ३९ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात १ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय येथे १०० जणांची चाचणी घेण्यात आली यात २ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मनपा मुख्यालय येथे ६९ जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. पोलीस आयुक्त कार्यालय येथे २० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक गतीने पसरत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेने आता कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारपासून (दि.२४) मनपा मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- अवकाळीचा फटका, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाखांची मदत
- वाह रे मनपा! २६ लाख औरंगाबादकरांवर वचक ठेवण्यासाठी फक्त ५० कर्मचारी
- देशात ‘टॉप टेन’मध्ये येण्यासाठी औरंगाबाद मनपाची जोरदार तयारी


