Share

देशात ‘टॉप टेन’मध्ये येण्यासाठी औरंगाबाद मनपाची जोरदार तयारी

Published On: 

औरंगाबाद : पुढील आठवड्यात केंद्रीय पथक शहरात दाखल होत आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये औरंगाबाद शहराने सहभाग नोंदवला आहे. त्या अनुषंगाने हे पथक शहरात पाहणी करणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशातील १० स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी औरंगाबाद पालिकने कामास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारपासून (दि.२५) सखोल अंतर्गत मूल्यांकन मोहीम राबविण्यात येणार आहे.

मनपानो या स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले की, तज्ज्ञांच्या भेटीपूर्वी मनपाने रहिवाशांकडून कचरा वेगळा करणे, घंट्या गाड्यांद्वारे घराघरात कचरा संकलन, वापर यांचा आढावा घेण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. स्वच्छता कामगारांद्वारे वैयक्तिक संरक्षक उपकरणे, प्रक्रियेच्या युनिटमध्ये कचरा वाहतूक करणे आणि साहित्यांची सुविधा आणि प्रक्रिया युनिटमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करत होते. केवळ स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधील सहभागाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणार नाही, तर स्वच्छता मोहिमेसाठी शहराची उत्तम तयारीही या माध्यमातून होईल, असे भोंबे यांनी सांगितले.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) आणि सिव्हिल रिस्पॉन्स टीम (सीआरटी) यांनी केंद्र सरकारच्या पथकासमोर सर्वेक्षण करण्यासाठी मनपाशी करार केला आहे. या अंतर्गत सर्वेक्षणात मनपाचे स्वच्छता निरीक्षक, स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणारे इंटर्नस आणि सीआरटीचे सदस्य शहरातील ११५ वॉर्डांपैकी प्रत्येक वॉर्डात सर्वेक्षण करतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!