Share

अवकाळीचा फटका, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाखांची मदत

Published On: 

उस्मानाबाद : गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वादळी वारा, पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर एका वर्षांनी त्या वेळची नुकसान भरपाई महाविकास आघाडीच्या सरकारने मंजूर केली आहे. नैसर्गिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयांची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे.

मागील वर्षी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये २४ हजार ५६९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झालेले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत त्यावेळी बाधित क्षेत्राची पाहणी केली होती. आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत संयुक्त पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आपत्तीग्रस्ताना भरपाई मंजूर झाली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या १६ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधीची प्रतीक्षा होती. जिल्ह्यासाठी २० कोटी ५८ लाखाचा निधी मिळाला असून कळंब तालुक्यात नुकसानीचा आकडा अधिक असल्याने कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे.

कळंब तालुक्याला सर्वाधिक मदत
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ९४५ इतकी होती. त्यातील एकट्या कळंब तालुक्यातील बाधितांची संख्या २९ हजार ९२७ एवढी आहे. कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!