Share

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक; पोलीस बंदोबस्त झुगारत कार्यकर्त्यांच्या पाण्यात उड्या

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये आंदोलन केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषावरुन मदत देण्यात यावी, अशी मागणी करत राजू शेट्टी हजारो शेतकऱ्यांसह जल समाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. सर्व शेतकऱ्यांसह राजू शेट्टी यांनी आंदोलन करत नृसिंहवाडी कडे निघाले आहेत.

नृसिंहवाडी येथे जाताना विना अडथळा जावू द्यावं, जर आडवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे. जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या बंदोबस्त जगारुन कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आहेत. राजू शेट्टी त्या ठिकाणी पोहचण्या आधीच काही कार्यकर्त्यांनी पाण्यात उडी घेत आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगितलं.

नदीच्या बाजूला असणाऱ्या ऊसामधून एका कार्यकर्त्याने पोलिसांची नजर चुकवत पाण्यात उडी घेतली आहे. राजू शेट्टी यांनी ज्या ठिकाणी जल समाधी घेण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम नृरसिंहवाडी येथे आहे. या नदीवरील पूलावरही पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. पोलिसांची नजर चुकवत आणि त्यांनी केलेला बंदोबस्त जुगारुन कार्यकर्त्यांनी पाण्यात उडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!