🕒 1 min read
पिंपरी : २०२० हे वर्ष संपायला अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. हे सरतं वर्ष अनेक संकटांचं ठरलं असतानाच येणारे वर्ष अधिकाधिक चांगलं जावं अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. यंदा नववर्षाच्या निर्बंध आले असून नागरिकांनी सतर्कता बाळगून साधेपणाने सेलिब्रेशन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. रात्री ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
२०२० या सरत्या वर्षाने आपल्याला आरोग्याची काळजी किती महत्वाची आहे हे चांगलंच शिकवलं आहे. आरोग्याची काळजी घेतली नाही तर कसा फटका बसू शकतो हे याचा धडा या वर्षाने शिकवलं आहे. नव्या वर्षाचं स्वागत म्हणलं की, धांगडधिंगा, मद्यप्राशन, पार्ट्यांचं आयोजन आलचं. मात्र, यावर्षी रात्री ११ नंतर संचारबंदी असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पिंपरीतील एका सामाजिक संस्थेने नववर्षाचं औचित्य साधून दूध वाटप केलं आहे. येणाऱ्या आरोग्यदायी वर्षाचं स्वागत मद्याने नाही तर शरीरासाठी पोषक दुध पिऊन करण्याचं आवाहन यावेळी संस्थेतर्फे करण्यात आलं. युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून अनोखा संदेश देत दूध वाटप या संस्थेतर्फे करण्यात आलं. स्थानिकांनी देखील या उपक्रमाला प्रतिसाद देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : CBSE १० वी, १२ वी च्या परीक्षांची तारीख ठरली
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना
- औरंगाबादमध्ये आता काँग्रेसचा महापौर बसवा; शिवसेनेच्या सत्तेला थोरातांचं थेट आव्हान
- मी रात्री ११ वाजता तिच्या घरी पोहोचलो आणि राहिलो तर? युवकाच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांचं सडेतोड उत्तर
- शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेत केला प्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
