Share

शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेत केला प्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळातही राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. या काळात टाळेबंदी व अन्य निर्बंध काढल्याने याचा फटका सर्वच नेत्यांना बसला. अनेकांनी आपल्या मागण्यांना दाद मिळावी म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’चा दरवाजा ठोठावला. राज ठाकरेंनी देखील या काळात सर्वच क्षेत्रातील समस्या स्वतः समजून घेत भेटी-गाठी घेतल्या.

कोरोनाचा प्रभाव ओसरताच नेत्यांनी पक्ष बदलास सुरुवात केली. याकाळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसह अनेक नेत्यांनी आपला मूळ पक्ष सोडून पक्षबदल केला. तर, टाळेबंदी काळानंतर मनसेने नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याने राज्यातील अनेक नागरिकांनी व इतर पक्षाच्या नेत्यांनी मनसेत प्रवेश केला होता.

आता, शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी मनसेत प्रवेश केला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृतपणे पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशासोबतच राज ठाकरे यांनी कौडगे यांच्यावर मनसे जिल्हाप्रमुखपदाची जवाबदारी सोपवली. कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. आता त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकत वाढण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!