Share

औरंगाबादेत आठवडी बाजारांना परवानगी, मात्र नागरिकांनी गर्दी न करत संयम राखण्याची गरज!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने आठवडी बाजार बंद केले होते. आता रुग्ण संख्या नियंत्रणात आल्याने पुन्हा एकदा आठवडी बाजार सुरू झाले आहेत. मात्र नागरिकांनी जास्त गर्दी न करता खरेदी करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांतर्फे तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात वर्तवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी आता संयम राखणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. आठवडी बाजार बंद करण्याबाबत स्थानिक पातळीवर महापालिकेने कारवाई केली होती. औरंगाबाद शहरात जाफरगेट भागात रविवारी, सोमवारी शहानुमियाँ दर्गा परिसरात, गुरुवारी छावणी भागात तर शुक्रवारी चिकलठाणा भागात बाजार भरवला जातो. फेब्रुवारी महिन्यापासून हे सर्व बाजार बंद होते. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने मागील आठवड्यापासून औरंगाबाद शहरात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे.

याविषयी पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील शुक्रवारचा बाजार, सोमवारचा बाजार भरवण्यात देखील परवानगी आहे. सोमवारी (दि.१२) शहानुरमियाँ दर्गा परिसरात आठवडी पीरबाजार भरला होता. मात्र दुकानांची संख्या मर्यादितच होती. ग्राहक देखील कमी दिसून आले. शासन निर्देशानुसार शहरात आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन ठेवलेला आहे. त्यामुळे जाफरगेट भागातील रविवारचा बाजार भरण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. गुरुवारच्या बाजाराबद्दल छावणी परिषद निर्णय घेईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!