Share

मला विश्वास आहे पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला.

‘धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. लोक धारातिर्थी पडू नये, लोकांचा जीव जाऊ नये यासाठी असा विचार त्यावेळचे योद्धे करायचे. आम्ही नव्या काळातील योद्धे आहोत. मी धर्मयुद्ध टाळण्याचा तोपर्यंत प्रयत्न करते जोपर्यंत शक्य आहे,’ असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या या भाषणानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे नाराज नसल्याचे सांगितले आहे. ‘पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्यास सांगितलं आहे. भाषणात जरी त्यांनी कौरव, पांडव, धर्मयुद्ध असे काही शब्द वापरले असले किंवा दृष्टांत दिले असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना काय संदेश दिला, काय निर्देश दिले हेच राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे. भाषणाचा मतितार्थ काढायचा असतो आणि पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा मतितार्थ म्हणजे कार्यकर्त्यांनी राजीनामे परत घ्यावे आणि कामाला लागावे. पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत असा विश्वास आहे. पंकजा मुंडे यांच्याशी आपलं नेहमीच बोलणं होत असतं. ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही नुकतंच भेटलो होतो. मी दाव्याने सांगू शकतो की त्या नाराज नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही राजीनामे देऊ नयेत’, अशी विनंती बावनकुळे यांनी केलीय.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!