औरंगाबाद : राज्य सरकारमधील जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. मात्र, या दोन्ही मंत्र्यांवर भुखंड बळकवण्याचे आरोप करण्यात आले आहे. भुमरे यांनी पैठण शहरातील शासकीय मालकीचा भुखंड हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले शेत बळकावल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
संबंधीत महिलेने काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये विधानभवनाबाहेर देखील आंदोलन केले होते. मात्र, मुख्यमंत्री किंवा संबंधीत यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर आता या महिलेने औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सत्तार यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाने हे शेत बळकावले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणात आपण लढा सुरूच ठेवणार असल्याचेही या महिलेने पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव इथली गट क्रमांक ३३६ हे शेत आपल्या वडिलांच्या मालकीचे असल्याचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आशाबाई धोंडू बोराडे यांचा दावा आहे. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर सत्तार यांनी ही जमीन बेकायदेशीररित्या बळकावून, त्याठिकाणी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम महाविद्यालयाचे अवैध बांधकाम केले असल्याचा आरोपही संबंधीत महिलेले केले आहे.
तलाठी तसेच तहसिल कार्यालयात अर्ज केल्यानंतरही सदरील जमिनीवर अवैध बांधकाम थांबले नसल्याने अखेर या महिलेने हा लढा रस्त्यावर उतरत लढण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सत्यता तपासून पाहावी लागणार असली तरी या सर्व प्रकारामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होणार असेच चित्र दिसून येतय.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच
- ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे – नवाब मलिक
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- नाना पटोले यांच्या विधानाची मोडतोड करून गैसरमज पसरवण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसची सारवासारव
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
