Share

मोठी बातमी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पोहचले राहुल गांधींच्या भेटीला

Published On: 

दिल्ली : २०१४ मध्ये देशभरात भाजपला मोठं यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे काँग्रेससह अनेक सत्ताधारी पक्षांची सत्ता गेली आणि भाजपने सत्ता काबीज केली. यामुळे, काँग्रेसला मोठा फटका तर बसलाच, पुढे सक्षम विरोधी पक्ष म्हणून मोदी सरकारवर दडपण निर्माण करण्यास देखील काँग्रेस व इतर विरोधी पक्ष अपयशी ठरले.

यामुळेच, २०१९ मध्ये भाजपला लोकसभेत अधिक यश मिळालं. दरम्यान, आता मोदी सरकारला भक्कम आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची गेल्या महिन्यात तीनवेळा भेट घेणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. नवी दिल्लीतल्या राहुल यांच्या निवासस्थानी ही भेट सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि वरिष्ठ नेते वेणुगोपालदेखील उपस्थित आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट झाली होती. एकाच महिन्यात तीनदा पवार आणि किशोर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आता किशोर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला पोहोचले आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल आणि किशोर यांची भेट होत असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!