पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
सरकारच्या गलथान कारभाराविरोधात भाजपमधील ओबीसी नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यसरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आज भाजपचे सर्व नेते एकदिलाने ‘चक्का जाम’ आंदोलनात उतरले असल्याचे दिसून आले.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा भाजपमधील अनेक नेत्यांसाठी एक चांगली चालून आलेली संधी असून याचा नक्की फायदा उठवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.ओबीसींच्या मतदारांवर भाजपची मोठी मदार असल्याने भाजपने या मुद्द्यावर आरपारच्या लढाईच्या तयारीत आहे. सत्ताधारी ओबीसी नेत्यांची या मुद्द्यावरून चांगलीच गोची झाली असताना भाजप हा मुद्दा उचलून या नेत्यांना खिंडीत पकडत आहे. या आंदोलनाच्या आणि या लढ्याच्या माध्यमातून ओबीसींच्या हिताची काळजी कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न भाजपमधील नेतेमंडळी करत असल्याचे दिसून येत आहेत. मागे जे झाले ते झाले आता पुन्हा सत्ता प्राप्त करायची असेल तर संघर्ष अटळ असल्याचे लक्षात आल्याने भाजपमध्ये एकजूट पाहायला मिळाली. जर आपण आपापसात भांडत बसलो तर आपले मतदार आपल्यापासून दुरावू शकतात या भीतीपोटीही हे सर्व नेते एकत्र आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ओबीसी हा वर्ग भाजपची व्होटबँक म्हणून ओळखला जातो त्यामुळे या वर्गाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सर्व शक्ती पणाला लावून भाजप पक्ष आज मैदानात उतरला. आपापसातील हेवेदावे, मतभेद बाजूला सारत भाजपनेत्यांनी आजचे आंदोलन यशस्वी करून दाखवले. यामुळेच भाजप नेते मागील काळात झालेल्या चुका सुधारत असल्याचे दिसून येत आहे. आज ‘चक्का जाम’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर,पंकजा मुंडे, रक्षा खडसे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे,गोपीचंद पडळकर, आशिष शेलार, योगेश टिळेकर, प्रकाश शेंडगे आदी दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. या माध्यमातून या सर्व नेत्यांनी आपापली ताकत अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली यामुळेच आज कॉंग्रेसने देखील राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती मात्र त्यांच्या आंदोलनाचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती


