Share

औरंगाबाद मनपाचा दणका! ‘याठिकाणी’ नालेसफाईवर झालेला खर्च व्यावसायिकांकडून वसूल करणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गुलमंडी परिसरात औषधी भवन जवळ असलेल्या इमारतीखालील नाल्याच्या स्वच्छतेवर यंदा महापालिकेने तब्बल सात लाख रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे हा खर्च आता औषधी भवन इमारतीत गाळे असलेल्या केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट संघटनेकडून वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याअनुषंगाने नुकतीच खर्च वसुलीची नोटीस केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनला पालिकेने बजावली आहे.

दरवर्षी नाल्यांच्या स्वच्छतेवर कंत्राटदारांकडून होणारा कोटींचा खर्च टाळण्यासाठी पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रत्येक प्रभाग कार्यालयामार्फतच त्या-त्या भागातील नाल्यांची स्वच्छता करुन घेण्याचे ठरवले. नियोजनानुसार पालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी शहरात नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामांना सुरुवात केली. सोबतच नाल्यावरील टोलेजंग इमारत मालकांनी त्या इमारती खालील नाल्याची स्वच्छता करुन घेण्याच्या सुचनाही केल्या.

मात्र अनेक दिवस प्रतिक्षा करुनही औषधी भवन केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाळा तोंडावर आल्याने अखेर पालिकेनेच या नाल्याची स्वच्छता करुन घेतली. यासाठी लागलेला खर्च वसुली करण्यासाठी आता पालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिशएनला नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता बी.डी. फड यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!