मुंबई : म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी(१२ डिसें.) आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली यामुळे परीक्षार्थीं संतापले आहेत. ‘काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली’ असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी मध्यरात्री ट्विटरला व्हिडीओ शेअर करत सांगितले होते. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला ६ आरोपींना पकडण्यात यश आले असून या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता(Amitabh Gupta) यांनी माहिती दिली आहे.
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हुशार विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडू देणार नाही, असे म्हंटले आहे. यासंदर्भात आव्हाडांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’हेच सत्य आहे पेपर फोडणार ह्या आधीच गुन्हेगारांना पकडले. पेपर फुटला नाही हुशार मेहनती विद्यार्थ्यांच्या मेहनती वर पाणी पडू देणार नाही.’
हेच सत्य आहे पेपर फोडणार ह्या आधीच गुन्हेगारांना पकडले
पेपर फुटला नाही
हुशार मेहनती विद्यार्थ्यांच्या मेहनती वर पाणी पडू देणार नाही
पारदक्षता प्रथम
आभार @DGPMaharashtra @CPPuneCity pic.twitter.com/yk7rRXk5mP— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 13, 2021
दरम्यान, म्हाडातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांवरील परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच रद्द केला आहे. परंतु, यापुढे असे गैरव्यवहार टाळण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेऐवजी म्हाडातर्फेच विविध पदांवरील उमेदवारांच्या भरतीचे पेपर तयार करून परीक्षा घेण्यात येतील. शिवाय, आताचे शुल्कही परत केले जाणार असून, पुन्हा परीक्षेचे शुल्कही घेतले जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही आव्हाड यांनी रविवारी ठाण्यात केली. ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्यामुळे परीक्षार्थीना जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आव्हाड यांनी माफीही मागितली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’

