🕒 1 min read
मुंबई : मुंबईतून गोव्याला निघालेल्या कोडोलिया क्रूझवर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दोन दिवसांपूर्वी आर्यन खानसह तीन जणांना अटक केली होती. यानंतर आज १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी चौघांना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली तर इतर चार जणांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. यात पार्टीचे आयोजन करणाऱ्या चार जणांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या १६ झाली आहे.
या पार्टीमुळे राज्यातील अंमली पदार्थाच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. तस्करी सुरू असतानाही राज्य सरकारला याचा सुगावा कसा लागला नाही असा हल्लाबोल करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राज्याचे गृहखाते आहे. त्यामुळे आपसूक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह ठाकरे सरकार निशाण्यावर आले आहे.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उद्या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्याच गैरकृत्याचा पर्दाफाश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतील बलार्ड इस्टेटमधील राष्ट्रवादी भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे. दि.६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आपण अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे चुकीची माहिती उघड करणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिला आहे. यामुळे उद्या मलिक काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
I will address a Press Conference tomorrow to expose the wrongdoings of the NCB.
Date: 6th October 2021 ( Wednesday )
Time : 12 pm
Venue : Rashtrawadi Bhavan, Ballard Estate, Mumbai— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 5, 2021
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील झोपलेत का?
मुंबईत अमलीपदार्थांची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अमलीपदार्थविरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ‘मागील वर्षभराच्या काळात राष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी पथकाकडून ४२ पेक्षा अधिक ठिकाणी धाडी टाकून राज्यातील बॉलिवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला, किमान त्यानंतर तरी राज्याच्या गृह विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील अमलीपदार्थांची पाळेमुळे शोधून कढायला पाहिजे होती. मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे.’ अशी टीका त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींना भेटण्यापासून रोखल्याने मुख्यमंत्र्यांचा विमानतळावर ठिय्या
- पाय खोलात! राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप
- ‘देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती अशक्य! लॉटरी एकदाच लागते, वारंवार नाही’
- ‘उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यालयाचा दुरुपयोग सुरू’, मंत्री यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप
- संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

