Share

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले..

Published On: 

नवी दिल्ली : देशात लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. काल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना लखीमपूर खेरी येथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या या दडपशाही विरोधात आवाज उठवण्याची गरज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात दिल्लीत बैठक झाली.

राहुल गांधी यांना भेटल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. देशात लोकशाही राहिली आहे का? लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असं राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले. तसंच राहुल गांधींसोबत काय चर्चा झाली? या प्रश्नाचं उत्तर देण्याचे मात्र संजय राऊत यांनी टाळले. तसेच दोघांमधील चर्चा जाहीर करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘ही सदिच्छा भेट होती. अनेक मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. काँग्रेसबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर राहुल गांधी समाधानी आहेत. पण चर्चेतील सर्वकाही बाबी सांगता येत नाहीत. त्या चार भींतीतल्याच असतात’, असे संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!