Share

शरद पवारांना आता आम्ही कायमचीचं विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांना आता सुरवात झाली आहे. या प्रचार सभांमधून सत्ताधारी विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करताना दिसत आहे. आत्ता तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी हा टोला लगावला आहे. यावेळी पाटील म्हणाले की, मला कोथरूडमध्ये अडकून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही कॉंग्रेसवाल्याना साधा उमेदवार मिळाला नाही. त्यावरून या पक्षांची ताकद कळते..मी या मतदार संघातून निवडून येणार हे सांगण्यासाठी जोतिष्याची गरज नाही असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपले वय विसरून निवडणुकीच्या कामात स्वतः ला झोकून दिले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांनाचं लक्ष्य केले असल्याचं दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठी गळती लागली होती. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा काढला होता. या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बऱ्या पैकी पुन्हा बळ प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181522059257532416?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181521100359884801?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181520898798448643?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!