🕒 1 min read
पिंपरी : महिला महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली होती. लाचखोरी प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने उग्र आंदोलन करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केला होता. यासोबतच, राष्ट्रवादीने स्थायी समितीच्या बैठकांवर बहिष्कार घालण्याची घोषणाही जाहीर केली होती.
मात्र, या घोषणेला आठवडा होण्याआधीच राष्ट्रवादीने पलटी मारत ‘लाचखोरांच्या पंगतीत आम्हीही’ अशी कबुली दिल्याचा प्रत्यय काल आला. कारण राष्ट्रवादीच्या सदस्यांनाच आपल्या पक्षाच्या भूमिकेचा विसर पडल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काल स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. इतकंच नाही तर सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावर आणलेल्या एकाही विषयाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध न करता मंजूर करण्यात मदत केली.
लाच प्रकरणात स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना अटक करण्यात आली होती. एसीबीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीने आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. स्थायी समिती बरखास्त करण्याचीही मागणी केली होती. मागील आठवड्यात (बुधवार दि. 1) झालेल्या स्थायीच्या बैठकीवर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकत आम्ही त्यांच्या पापात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही बहिष्काराची घोषणा केली होती.
मात्र, कालच्या स्थायी बैठकीला राष्ट्रवादीच्या साड्यांची हजेरी लावली. यानंतर, भ्रष्टाचाराचे आरोप करणारी राष्ट्रवादी अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा केली जात होती. याउलट स्थिती काल पाहायला मिळाली. प्रत्यक्षात सदस्यांना विषयपत्रिकेवरील विषयच माहिती नसल्याचे समोर आले आहे. ज्या प्रकारामुळे सत्ताधारी भाजपवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अवघ्या आठच दिवसांत कारभार सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरे हा भारताचा संघ की मुंबई इंडियन्सचा?; टी 20 विश्वचषक संघावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
- क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा तालिबानला इशारा; ‘महिला क्रिकेटला समर्थन द्या अन्यथा…’
- ‘ज्यांना भुजबळ करू अशी धमकी विरोधक देत आहेत, ते देखील निर्दोष सुटतील’
- स्थानिक पातळ्यांवर अजूनही महाविकास आघाडीत बिघाडी? खुद्द अजित पवारच म्हणाले…
- दमानिया यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुठे वाटेल तिथे खुशाल जावं, पण…; भुजबळांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
