मुंबई : राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यावर आता भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते @PawarSpeaks गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच. pic.twitter.com/dnePHj6B5e
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 8, 2021
भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खूर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू तर शरद पवारच’. अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
राज्यसभेतील १२ खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारातील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन यांनी काल १२ निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली.
खासदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांनी माफी मागितल्याशिवाय निलंबनाची कारवाई रद्द होणार नसल्याची भूमिका राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे. निलंबित खासदार दररोज सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत संसदेच्या आवारात धरणे आंदोलन करत आहेत. विविध पक्षांच्या खासदारांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उध्दव ठाकरेंचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यावर टीका
- ‘राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे’
- माझ्या जिल्ह्याची ‘ही’ ओळख पुसून काढायची आहे – विजय वडेट्टीवार
- एजाज पटेलने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य
- हेच का तुमचे संस्कार?; शाळेवर हल्लाप्रकरणी जितेंद्र आव्हाड संतप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

