Share

‘जमिनीशी घट्ट नातं असलेला युवा नेता गमावला..’, धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

Published On: 

बीड: काँग्रेस खासदार तसेच शांत स्वभावाचे नेता अशी ओळख असलेले राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील एका शहीद सैनिक पत्नीला सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून जमीन मिळावी यासाठी माझ्याशी संपर्क करून पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहास्तव विशेष बाब म्हणून त्या शहीद सैनिक पत्नीला आम्ही मदत केली. सामान्य माणसाच्या कामाची कणव राजीव सातवांच्या कामातुन दिसत, सातवांची एक आठवण या वेळी मुंडेंनी सोशल मिडियावर व्यक्त केली आहे.

काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मागील २३ दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!