दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक मान्यवर पुढे येत वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कोरोनाच्या या लढ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीरनेही पुढे येत एका औषधाचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील महिन्यात २५ एप्रिल रोजी गौतम गंभीरने एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये गंभीरने फॅबीप्लू हे औषध मोफत वाटण्याची घोषणा केली होती. तसेच हे औषध मिळवण्यासाठी ठिकाण आणि वेळही दिली होती. मात्र काही दिवसानंतर या ट्विटवर पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी हे औषध गंभीरला कुठे मिळाली याची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात गौतम गंभीरला सवाल जवाबाला सामोरे जावे लागणार आहे.
We all have to stand by each other to survive. Will provide ‘Fabiflu’ to as many as we can in Delhi from GGF office (22, Pusa Road) between 10-4 from tmrw for FREE. Kindly bring Aadhar & prescription. Arranging for more O2 cylinders as well. #InThisTogether
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 25, 2021
या मोफत औषधवाटपावरुन तो आता विरोधकांच्या रडारवर आला आहे. काँग्रेसचे पवन खेरा आणि आम जनता पार्टीचे दुर्गेश पाठक यांनी गंभीरवर आरोप करत त्याने ती औषधे कुठुन आणली अशी चौकशी करण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसात गंभीरला दिल्ली पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागु शकते
महत्वाच्या बातम्या
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- करण जोहरने नाकारल्यानंतर कार्तिक आर्यनला दिली ‘या’ निर्मात्याने संधी
- ‘…तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो’
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना


