Share

कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘या’ स्टेडियमच्या वापराचा सरकारपुढं प्रस्ताव

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बरेच सेलेब्रिटी व क्रिकेटपटू मदतीसाठी समोर आले आहेत.

यातच कोरोना विरुद्ध देशभर सुरु असलेल्या लढाईत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघानं देखील पुढाकार घेतला आहे. कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमचा (फिरोजशाह कोटला मैदान) उपयोग लसीकरण केंद्र आणि आयसोलेशन सेंटर यासाठी करावा असा प्रस्ताव संघटनेनं दिल्ली सरकारपुढं सादर केला आहे. असा प्रस्ताव सादर केल्याची माहिती संघटनेचे कोषाध्यक्ष शशी खन्ना यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, ‘ या स्टेडियममध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत सूविधांसह पार्किंगची मोठी व्यवस्था आहे. त्याचबरोबर दिल्लीत मोठ्या लोकसंख्येला हे स्टेडियम जवळ आहे. याचा उपयोग लसीकरण किंवा आयसोलेशन सेंटरसाठी केला तर राजधानीतील मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा होईल.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!