पुणे : “गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी समाजमाध्यमाचा अतिशय उत्तम वापर केला. आम्ही ही गोष्ट त्यांच्याकडून शिकत आहोत, याबाबतीत त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
समाजमाध्यमांच्या वापरात भाजप आपल्यापेक्षा वरचढ ठरली असल्याचीही जाहीर कबुली रोहित यांनी दिली आहे. डिजिटल मिडीयाप्रेमी मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मिडीया संमेलनात ‘राजकारणातील सोशल मिडिया’ या चर्चासत्रात रोहित पवार बोलत होते. या चर्चासत्रात पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार योगेश कदम या युवा राजकारणातील व्यक्तिमत्वांनी सहभाग घेतला होता.
या सर्व युवा राजकारण्यांशी विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्याविभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक समीर आठल्ये, प्राची रेगे, प्रदीप लोखंडे इत्यादी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

