Share

“योगींच्या भगव्या वस्त्राचा अपमान…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. अयोध्या जाण्यापूर्वी त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी  आपल्या पक्षातील नेत्यांची काय वक्तव्य आहेत, हे समजून घ्या. असा टोला संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी लगावला आहे.

‘एक गंजा आदमी भगवे कपडे पहणकर पागल जैसा घुमता है’, असे म्हणणारे अयोध्या चाललेत. आता योगीजी त्यांचे कसे स्वागत करतात, हे मला बघायचे आहे. ज्यांनी योगींच्या भगव्या वस्त्राचा अपमान केला होता, ते हिंदुत्ववादी कधी झाले? यावर जास्त बोललो तर यांचे बाहेर जाणे अवघड होईल. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी यांनी म्हटले होते की, हनुमान चालीसा पठन करण्यामुळे तुरुंगात टाकले जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असते. यावरही प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांना चिंता करण्याची गरज नाही. हनुमान चालीसाच्या नावाने देशात दंगे घडवण्याचा ज्यांचा डाव आहे. त्यांच्याशी शिवसेना लढतेय. यामुळे बाळासाहेब ठाकरे आमच्यावर फुले उधळत असतील.”,

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!