🕒 1 min read
कोल्हापूर : कोकण आणि कोल्हापूर भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरातील मिठापासून पीठापर्यंत सर्वच वस्तू खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. या आधी २०१९ मध्ये आलेल्या पूरात नागरिकांची सर्व कागदपत्रे वाहून गेली होती. त्यामुळे साधे राशनकार्डही न मागता आम्ही मदत केली होती. तशीच मदत या सरकारने करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.
राधानगरी किंवा अलमट्टी विसर्गाचा प्रश्न नसताना आणि पाऊस फार नसताना सुद्धा ही आपत्ती आली, त्यामुळे या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दुष्काळी भागात पाणी वळविणे हा उपाय आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये जागतिक बँकेने यासाठी अर्थसहाय्य मंजूर केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1421027366969638916
नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मदतीची नागरिकांना जास्त गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकारात लवकर घोषणा करावी आणि नागरिकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- मी येतोय, भेटण्यासाठी थांबा… मुख्यमंत्र्यांनी दिला होता निरोप; प्रविण दरेकर यांचा दावा
- पूरग्रस्तांना मदत कधी? प्रश्नाला उत्तर न देता जाणाऱ्या मंत्री राऊत यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

