Share

पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धासू सलामीवीर देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी -20 मध्ये पदार्पण केले. दुसऱ्या टी-20 आंतराष्ट्रीय पदार्पण करताच भारतीय संघाचा युवा पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्लने इतिहास रचला आहे. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. या सामन्यात पडिक्कलने जोरदार सुरुवात केली पण डावाचे रुपांतर मोठ्या धावसंख्येमध्ये करता आले नाही. त्याने 23 चेंडूत एका षटकार आणि एका षटकारासह 29 धावा केल्या.

पडिक्कलचा जन्म 7 जुलै, 2000 रोजी झाला होता आणि टीम इंडिया कडून खेळणारा तो 21 व्या शतकातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे.  दुसऱ्या टी -20 मध्ये  नितीश राणा, रुतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया यांनीही पडिक्क्ल समवेत या सामन्यात पदार्पण केले.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत पाच गडी गमावून 132 धावा केल्या. भारताकडून कर्णधार शिखर धवनने ४२ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने दोन तर वनिंदू हसरंगा, दासुन शनाका आणि दुश्मंता चामिराला प्रत्येकी एक गडी बाद केले.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने आर प्रेमादासा स्टेडियमवर भारताविरुद्धच्या दुसर्‍या टी -२० मध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना मंगळवारी खेळला जाणार होता, परंतु सामना सुरू होण्याच्या काही दिवस आधी टीम इंडियाचा अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामना एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ४ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला. भारताने दिलेले १३३ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने ६ गडी गमावून पार केले. यासह श्रीलंकेने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!