मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीतच त्यांना अचानक अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त आहे.
‘जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम असून नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,’ अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार घातल्याने आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा देखील केला होता.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी मंगळवारी मिरज तालुक्यातील कवठेपिरान सावळवाडी, माळवाडी याभागाचा पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला. जयंत पाटील यांनी पाण्याने वेढलेल्या सावळवाडी व माळवाडी गावास मोटार सायकलवरून भेट देऊन पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अन्नधान्याचंही वाटप केलं. यानंतर ते आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज’
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शाळेच्या फी कपातीला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; लवकरच अध्यादेश काढणार
- ‘जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात; त्यामुळे त्यांना घरचेही फार गांभीर्याने घेत नसावेत’
- नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

