Share

‘ठाकरे सरकारला जागं करण्यासाठी आपला लढा आणखी तीव्र करावा लागेल’

Published On: 

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्याच सोबत ठाकरे सरकारला जागं करण्यासाठी आपल्याला हा लढा आणखी तीव्र करावा लागेल, असं देखील ते यावेळी म्हणाले. रामदास आठवले यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते.

एसटीचे विलीनीकरण आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ठाकरे सरकारला जाग आणावी लागणार आहे. त्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल असे आठवले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एसटी नसती तर मी पुढारी झालो नसतो, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी देखील कर्मचाऱ्यांसामोर मांडल्या.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संपाचा तिढा सोडविण्यासाठी काही उपाय किंवा सर्वसामायिक व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यावर तोडगा काढता येऊ शकतो का, अशी विचारणा न्यायालयानं राज्य सरकार आणि एस टी संघटनांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!