Share

“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे…”, अमोल मिटकरींचा अमेय खोपकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आणि तारखेनुसार जयंती साजरी करण्यात येते. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण असल्याचे म्हटले होते. यावर मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर देत अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत असे म्हटले होते. आणि हा वाद येत्हूल सुरु झाला. आता यावरच अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. दरम्यान अमेय खोपकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले होते की, “तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.” आता ही शाब्दिक चकमक अधिकच तीव्र स्वरूप घेत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटला अमेय खोपकर परत काही प्रत्युत्तर देतील, की हा वाद येथेच शमेल याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांच्यातील शाब्दिक वाद राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!