Share

VIDEO: वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर बिस्माह मारुफच्या चिमुरडीसह पाकच्या खेळाडूंनी गायले गाणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानने १३ वर्षात टूर्नामेंटमध्ये पहिला विजय मिळवून इतिहास रचला, ज्यात त्यांनी वेस्ट इंडिजला सामन्यात आठ गडी राखून पराभूत केले होते. पावसामुळे २० ओव्हरमध्ये झालेल्या या सामन्यात पाकच्या महिलांनी अप्रतिम कामगिरी केली. दम्यान, या निकालामुळे वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

वेस्ट इंडीजवर विजयानंतर पाकिस्तान महिला संघाने ‘दिल पाकिस्तान’ हे गाणे गात आनंद साजरा केला. भारत विरुद्धच्या सामन्यानंतर इंटरनेट सेन्सेशन बनलेली पाकिस्तानचा कर्णधार मारूफची (bismah maroof) मुलगी फातिमा देखील सांघिक गाण्यात उपस्थित होती. खेळाडूंनी गाणे म्हणताच मारूफने तिला हातात धरले. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पावसामुळे २० ओव्हरच्या झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने ८९ धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना केवळ २ गाडी गमावत पाकने १८.५ ओव्हरमध्येच विजय मिळवला. स्पर्धेत पाकिस्तानचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या आशेने ते २४ मार्चला इंग्लंड आणि २६ मार्चला न्यूझीलँडचा सामना करतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!