Share

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता!

Published On: 

मुंबई : राज्यातील काही भागात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण असल्याचे दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट दिला आहे. सध्या तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसणार नाही, परंतु पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि 23, 24 आणि 25 मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा –

विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. त्यामुळे त्या भागात माठाची मागणी वाढत आहे. भंडारा जिल्ह्यातील पालंदूर गावात तयार होणारे माठ थेट जिल्ह्याच्या बाहेर जात आहेत. विदर्भातही माठाची मागणी वाढली आहे. एकीकडे कमालीची उष्णता तर दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!