मुंबई: आजपासून (३ मार्च) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधत सरकार चांगलं काम करतंय म्हणून अनेकांना अस्वस्थता असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांनी म्हटले की, “दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणलं आहे. तुमचे सरकार चांगलं काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ मी पाहिलं नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचं आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते. पण भाजपच्या लोकांचं काहीतरी वेगळं आहे.”, अशा शब्दात पवारांनी भाजपला सुनावले आहे.
दरम्यान भाजपने आजच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा संकल्प केला आहे. काल (२ मार्च ) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांनवरून ठाकरे सरकारला सुनावले. शेतकरी प्रश्न, नवाब मलिक राजीनामा तसेच इतर प्र्श्नांसाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“… आणि आम्ही ४ तास गप्पा मारल्या” विराट कोहलीसोबत भेटीच्या आठवणींचा जेमिमाहने केला खुलासा
“ईडीसारख्या संस्था भाजपची धुणीभांडी करणाऱ्या घरगड्यांप्रमाणे…”, राऊतांचे टीकास्त्र
संघातून बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याला बीसीसीआयकडून धक्का, करारात A मधून C मध्ये हकालपट्टी
- दिलासादायक बातमी! १ एप्रिल २०२२० पासून राज्यात एकही कोविड मृत्यू नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

