Share

राष्ट्रवादीत वाजली टीक-टीक; भाजपची वाढली धड-धड

Published On: 

🕒 1 min read

सांगली: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीने भाजपला मोठा दणका दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर मोठी काबीज केली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Former Minister of State Shivajirao Naik) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित करत भाजपची धड-धड वाढवली आहे.

शिवाजीराव नाईक यांनी त्यांच्या वाढदिवशीच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी मुंबईत भेट घेतली.

दरम्यान शिवाजीराव नाईक यांचा शरद पवार तसेच इतर नेत्यांच्या उपस्थितीत २ एप्रिल २०२२ रोजी शिराळ्यात भव्य शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होणार आहे. शिवाजीराव नाईक हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे माजी आमदार आणि राज्यमंत्री आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!