Share

भावना गवळींना चिकणगुणिया झाल्याचे आमच्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट; वकीलाचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुणियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकणार नाहीत. हजर राहण्यासाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचे पत्र देण्यात आले आहे. गर्व्हमेंटचे मेडिकल सर्टिफिकेटही आमच्याकडे आहे. असे स्पष्टीकरण भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिले आहे.

यावेळी अॅड इंद्रपाल सिंग प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, भावना गवळी मॅडम १३ ऑक्टोबरपासून आजारी आहेत. त्यांच्यावर सरकारी डॉक्टर उपचार करत आहेत. या डॉक्टरांनी तसे प्रमाणपत्र दिले आहे. चिकणगुणियामुळे त्यांच्या पायांना सूज आली आहे. पंधरा दिवसांत आम्ही ईडीसमोर हजर होणार आहे. असे आम्ही ईडीला सांगितले आहे. हे प्रकरण जरा वेगळ आहे, पोलिसांनी केलेल्या तपासाला ईडी बदलवण्याचा प्रयत्न करत आहे.

भावना गवळी यापूर्वी ईडीसमोर चौकशीला का हजर झाल्या नाहीत? या प्रश्नाला उत्तर देताना इंद्रपाल सिंग म्हणाले, तेव्हा मॅडम दिल्लीला होत्या, त्यांचे काही नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे त्या हजर होऊ शकल्या नाहीत. याविरोधात भावना गवळी यांनीही तक्रार केली आहे. ईडीला आम्ही भावना गवळी यांच्या लेअरहेडवर लिहून दिले आहे. असेही इंद्रपाल सिंग म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!